मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदार नोंदणी गीताची निर्मिती
अकोला, दि. 2 : जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून मतदार जनजागृती कार्यक्रमात मतदार नोंदणी गीताची निर्मिती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आज त्यांच्या दालनात गीताचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. बाळापूर येथील तहसीलदार राहुल तायडे व विविध अधिकारी उपस्थित होते.
नवमतदारांच्या नोंदणीसाठी दि. ४ व ५ नोव्हेंबरला विशेष शिबिरे होणार असून, स्थानिक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व सर्व पात्र व्यक्तींनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी केले.
जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून मतदार नोंदणी गीत जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. संकल्पना बाळापूरचे तहसीलदार राहुल तायडे यांची असून, निर्मिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर व उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांची आहे. गीत, संगीत, गायन, दिग्दर्शन संघदास वानखडे यांचे असून, गीताच्या व्हीडिओत कलाकार तुळशीदास खिरोडकर यांनी भूमिका वठवली आहे. निर्मितीसाठी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, बळवंत अरखराव, शरद जावळे, तहसीलदार शिल्पा बोबडे, पवन पाटील, सुनील चव्हाण, दीपक बाजड, रवी काळे, संतोष यावलीकर, अतुल सोनवणे, विजय सरडकर यांचे सहकार्य लाभले आहे.