सतत तीस वर्ष आमदार राहिलेले आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन!
अकोला पश्चिम मतदार संघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या आज सायंकाळी साडे आठ वाजता दुःखद निधन झाले. आमदार गोवर्धन शर्मा हे सतत तीस वर्ष आमदार राहाले आहेत. आमदार गोवर्धन शर्मा रामनवमी शोभायात्रा समितीचे सतत अध्यक्ष राहिले आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असायचा आमदार गोवर्धन शर्मा हे गोपीनाथजी मुंडे आणि प्रमोद महाजन तसेच स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर प्रमिलाताई टोपले वसंतराव देशमुख संजय भाऊ धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे.