लालाजी असा नेता होता की त्यांना निवडणुकीत उभं करण्यासाठी आम्हाला मागे लागावं लागत होतं! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघाचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं दुःखत निधन झालंय. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिमसंस्कार पार पडणार आहे. अंतिम दर्शन घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले असून त्यांनी अंतिम दर्शन घेतले आहे. दरम्यान राहत्या घरी त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचार दरम्यान काल शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शर्मा यांचा मृत्यु झालाय. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच राजकीय नेत्यांकडून दुःखद वेदना व्यक्त होतायत. तब्बल तीन दशके आमदार राहिले आहेत.
लालाजी असा नेता होता की त्यांना निवडणुकीत उभं करण्यासाठी आम्हाला मागे लागावं लागत होतं, मंत्रीपद भेटलय नंतर सोडून दिलं. अनेक नेत्यांकडे फोन असूनही ते अवेलेबल नसतात, परन्तु लालाजी यांच्याकड़ं फोन नव्हता, ना ते व्हाट्सअप वर होते, ना सोशल मीडियाचं टेंशन होतं. तरीही ते २४ तास लोकांसाठी ते अवेलेबल राहायचे. असा मॅन टू मॅन लालाजी चा लोकांशी संपर्क होता, असे शब्दात फडणीसांनी भावना व्यक्त करून लालाजींना श्रद्धांजलि वाहली..