अखेर हरवलेली सीमा ताई परत येणार घरी!

अखेर हरवलेली सीमा ताई परत येणार घरी!

तरुणाच्या समयसूचकतेने कुटूंबाची होणार भेट

काही दिवसापूर्वी आपल्या पातूर शहरातील सीमा संजय वानखडे नामक स्त्री आपल्या लहान बाळासह पातूर येथून हरविली असता तिचा ,परिवाराने व शहरातील समाजसेवीकांकडून शोध सुरु झालं .
मधील काळात अंबेजोगाई येथून एक व्हीडीओ वायरल झालं , तेथून रेल्वेने आणखी कुठे सीमा व तिचे बाळ सोबत निघून गेले परंतु शोध लागला नाही ,घरच्यांनी अखेर पोलिस ठाण्यात हरवल्या संदर्भात रिपोर्ट सुद्धा दिला परंतु सीमा तायडे यांचा काही थांग पत्ता लागत नव्हता, अश्यातच आज आपल्याच पातूर शहरातील आदित्य विष्णु फुलारी हा मेंटनन्स चे कार्य करतो आणि त्या निमित्ताने रेल्वे ने प्रवास करतो, आपले कर्तव्य बजावत असताना नेहमी प्रमाणे प्रवास करत असताना कल्याण रेल्वे स्टेशन येथे सीमा तायडे ही महिला निदर्शनास आली , व तिच्याशी आदित्य ने ओळख पटवून रीतसर कल्याण स्टेशन येथील पोलीस कर्मचारी व रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क करुन सीमा तायडे या महिलेला आदित्य कल्याण ते पुणे रेल्वे ने सोबत घेऊन पुणे पर्यंत प्रवास करणार आहे व पुणे येथून पातूर येथील पुणे स्थित राहुल वाघमारे हे पातूर साठी रवाना होत आहे , पातूर शहरातील या तरुणां च्या माध्यमातून सीमा ताई तिच्या चिमुकल्या सह अखेर आपल्या घरी येणार आहे,
निखिल इंगळे सह किरण निमकंडे शहर प्रतिनिधी पातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news