स्व.गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने लोकनायक हरवला – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

स्व.गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने लोकनायक हरवला – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अकोला, दि. ५ : आमदार स्व. गोवर्धन शर्मा हे कायम जमिनीशी जोडलेले नेते होते. शेतकरी व शेती प्रश्नाबाबत त्यांच्या मनात कायम तळमळ होती. विदर्भाच्या विकासाची कायम भूमिका मांडणारे नेते म्हणून गोवर्धन शर्मा यांचे योगदान मोठे असून त्यांच्या निधनामुळे लोकनायक हरवला, अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार स्व. गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.

श्री. विखे पाटील यांनी आमदार स्व. गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी भेट दिली व श्रीमती गंगादेवी शर्मा, कृष्णा शर्मा, अनुप शर्मा यांच्यासह कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, स्व. गोवर्धन शर्मा यांनी नेहमीच पक्ष विरहित राजकारण केले. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम आग्रह धरणे हा त्यांचा स्वभाव होता. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपणारा नेता म्हणून स्व. शर्मा यांचे योगदान कोणीही विसरू शकणार नाही.

यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल, ॲड.किरण सरनाईक, विधानसभा सदस्य रणधीर सावरकर, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे,उपविभागीय अधिकारी शरद जावळे
उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news