स्व डँडी देशमुख स्मृती लघुचित्रपट महोत्सव आढावा बैठक संपन्न.
====================
अकोला :विदर्भात सर्वोत्तम चित्रपटांची निर्मिती करुन चित्रपट निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविणारे अष्टपैलु व्यक्तीमत्व स्व.डँडी देशमुख यांच्या 27 डिसेंबर जयंती दिनानिमित्त अकोला येथे दरवर्षी लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीचा महोत्सव साजरा करण्यासाठी हॉटेल सेंटर प्लाझा येथे आढावा बैठक संपन्न झाली.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी चित्रपट निर्माता,कलावंत तथा माजी आमदार प्रा तुकाराम बिडकर होते तर प्रशांत देशमुख, डॉ राजेश देशमुख, प्रा सदाशिव शेळके,प्रा श्रीराम पालकर,कुणाल देशमुख, आदी मार्गदर्शकांची उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान प्रा तुकारामजी बिडकर यांनी नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले,तसेच सदर चित्रपट महोत्सवासाठी आजपर्यत देशभरातुन विविध राज्यभाषेच्या 150 च्या वर लघुचित्रपट प्रवेशिका प्राप्त झाल्याची माहीती प्रा तुकाराम बिडकरांनी उपस्थितांना देतांनाच राज्य व देशातील लघुचित्रपट निर्मात्यांना दि 1 डिसेंबरपर्यत विनामुल्य प्रवेशिका www.theddff.com या संकेतस्थळावर पाठविण्याचे आवाहन केले. बैठकीदरम्यान उपस्थितांच्या सुचनेनुसार लघुचित्रपट महोत्सव यशस्वितेसाठी विविध कार्यक्रम समित्यांची निर्मिती करण्यात आली. सदर नियोजन बैठकीस सर्वश्री,प्राचार्य किसन मेहरे,जगतजीवन पल्हाडे, प्रा अशोक राहाटे, डॉ सुर्यभान नागुलकर,प्रा अशोक भराड,प्रा दिलीप अप्तुरकर,प्रा कैलास देवबाले,निलेश पवार,डॉ प्रभाकर मोहे,प्रफुल देशमुख, बबलु तायडे आदींची प्रामुख्याने होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सदाशिव शेळके यांनी तर आभारप्रदर्शन प्रा श्रीराम पालकर यांनी केले.अशी माहीती महोत्सव समितीचे प्रसिद्धी प्रमुख प्रा अशोक भराड व डॉ प्रभाकर मोहे यांनी पत्रकाद्वारे कळविले.