माळी समाज राज्यस्तरीय परिचय महासम्मेलन शेगांवात – कार्याध्यक्षपदी अनिल गिऱ्हे
अकोला – माळी समाजाचे 30 वे राज्यस्तरीय परिचय महासम्मेलन शेगांव येथे आयोजित करण्यात आले असून नुकतेच राज्यस्तरीय कार्यकर्त्यांच्या खामगांव येथे झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी खामगांव विभागातील डॉ. भाष्करराव चरखे, अकोला विभागातून कार्याध्यक्षपदी अनिल गिऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे.
माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकारीणीमध्ये निवड करण्यात आली. यामध्ये डॉ. शंकरराव क्षिरसागर, सुरेश गिऱ्हे, श्रीकृष्ण बोळे, बंडूभाऊ इंगळे, प्रकाशजी कापुरे, संजय वानखडे, रमेश हिवराळे, दिनेश तायडे, आत्माराम जाधव, श्रीकांत तायडे, गोपाल तायडे हे मार्गदर्शक असून उपाध्यक्षपदी शंकरराव गिऱ्हे, कैलास जामगडे, रामराव खोपडे, प्रदीप राऊत, गणेशराव वैराळे, विठ्ठलराव ढगे, सचिवपदी राजेश तायडे, सहसचिवपदी प्रा. नितीन देऊळकार, विजय क्षिरसागर, कोषाध्यक्षपदी नितीन इंगळे, विनोद इंगळे, प्रचार संपर्क प्रमुख दिपक रौंदळे, सह संदीप शेवलकार, रमेश राऊत, दिपक सदाफळे, राजुभाऊ ठग, गजाननराव राऊत, सुभाष राऊत, अरुण भवाने, अमोल बगाडे, विजय वानखडे, डॉ. चंद्रकांत बोळे, सुनिल जाधव, अरुण ढाकुलकर, हेमंत पापडे, निळकंठ तायडे, गणेश बोचरे आदींची निवड करण्यात आली आहे.