अकोला महानगरपालिका व्दारा महान जलशुध्दी केंद्र येथे साजरी करण्यात येणार जल दिवाळी.
अकोला दि. 6 नोव्हेंबर 2023 शासनाव्दारे DAY- NULM व AMRUT 2.0 च्या कृतीसंगमामधून अकोला महानगरपालिकेची Women For Water, Water For Women Campaign साठी निवड करण्यात आलेली आहे. यासाठी अकोला महानगरपालिकेकडून नोडल अधिकारी म्हणून NULM विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर आणि पाणी पुरवठा विभागाचे अमृत समन्वयक (अभियंता) नरेश बावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर मोहिमेअंतर्गत दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 वा NULM अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बचतगटातील 45 महिलांची WTP (जल शुध्दीकरण प्रकल्प, महान) या ठिकाणी भेट आयोजित केलेली असून सदर उपक्रमातुन महिलांना पाण्याचे महत्व आणि नळाच्या पाण्यामुळे महिलांचे होणारे बळकटी करण/ सशक्तीकरण या बाबतची माहिती देण्यात येणार आहे. सहभागी महिलांना दिवाळी निमित्त भेटवस्तु देण्यात येणार आहे. अशा प्रकारे अकोला महानगरपालिकेच्या माध्यमातून “जल दिवाळी” उपक्रम राबविण्यात येणार आहे.