मनपातील कर्मचारी तुपाशी! मात्र ग्रामिण मानसेवी कर्मचारी उपाशी!
आयुक्त तथा प्रशासक दिर्घ रजेवर?
अकोला महानगरपालिकेतील मानसेवी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हे अगदी बोटावर मोजण्या इतक्या पगारावर आपला उद्धव निर्वाह चालवतात. अकोला महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे फेस्टिवल ॲडव्हान्स देण्यात आला.
मात्र मानधन तत्त्वावरील व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कुठलाही फेस्टिवल ॲडव्हान्स दिल्यात न आल्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी आता अंधारात राहणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. लेखा विभागाच्या हलगर्जी पणामुळे या कर्मचाऱ्यांना आपली दिवाळी अंधारात काढावी लागणार आहे.अकोला मनपात दिवाळी निमित्त अग्रिम राशी 10 हजार रुपये देण्यात येतात.
तसेच मनपा सेवेत असलेले ग्रामीण व मानसेवी कर्मचाऱ्यांना सुध्दा अग्रिम रुपये देण्यात येतात परंतु 1 तारखेला स्थाई कर्मचाऱ्यांना पगार व अग्रिम 10 हजार रुपये देण्यात आले.
परंतु या कर्मचाऱ्यांचा कोणी वाली नसल्याने आतापर्यंत अग्रिम देण्यात न आल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.
लेखा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हे कर्मचारी अग्रिम पासुन वंचीत राहल्याचे दिसते.आयुक्त तथा प्रशासक हे वैद्यकीय रजेवर असल्या कारणाने अग्रिम राशी मंजुर करायला अधिकारी नसल्यामुळे हि परिस्थिती ओढावली असल्याने यावर्षी ग्रामीण तसेच मानसेवी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.
यावर आयुक्त जरी रजेवर असतील तरी त्यांनी दिवाळी सण पाहता या कर्मचाऱ्यांना अग्रिम राशी देण्याची मागणी होत आहे तसेच यास विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीची मागणी होत आहे. चार दिवसावर दिवाळी असल्याने आयुक्तांनी आम्हाला पण अग्रिम देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.