शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऊबाठा गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू!
अकोला अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी अकोला जिल्हा शिवसेने तर्फे आमरण उपोषण जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे
सन २०२२-२३ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची रक्कम शासनाने जाहीर केल्या प्रमाणे हेक्टरी १३६०० /- रुपये प्रमाणे ३ हेक्टरच्या मर्यादीत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
सन २०२२-२३ मधील खरीप हंगामातील सोयाबीन पिक विमा अधिसूचना काढून सुध्दा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही ती तातडीने दिवाळीपूर्वी जमा करण्यात यावी.
सन २०२३ २४ च्या खरीप हंगामात २१ दिवसाच्या वर पावसात खंड पडल्याने विमा कंपन्यांना नियमानुसार एक महिण्याच्या आत शेतकऱ्यांना विम्याची २५% रक्कम नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे तशी अधिसूचना तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी काढून सुध्दा शेतकन्यांच्या नुकसानीची २५% रक्कम मिळाली नाही ती दिवाळीपूर्वी जमा करण्यात यावी.
ज्या शेत शिवारातील विद्युत ट्रान्सफार्मर खराब झाले आहे तेथील शेतकऱ्यांना विज बिल भरण्याची जबरदस्ती केली जाते. त्याशिवाय ट्रान्सफार्मर दुरुस्त करून किंवा दुसरे बसविले जात नाही अश्या ठिकाणांचे ट्रान्सफार्मर विना विलंब बसविण्यात यावे.
पावसा अभावी जमीनीतील ओलावा कमी झाल्यामुळे सद्यपरिस्थितीत कपाशी, तूर आदी पिके सुकली आहेत. त्यामुळे उत्पादनात ७५% पेक्षा जास्त घट होत आहे. या सर्व नुकसानीचा सर्व्हे करून कपाशी पिकाला विमा तात्काळ देण्यात यावा
अकोला जिल्हा हा अवर्षण प्रवण क्षेत्रात आहेच पण चालु हंगामी वर्षात अत्यल्प पाऊस व त्यामुळे झालेले शेतीचे नुकसान ह्या सर्व बाबींचा विचार करता जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. ७) सन २०२२-२३ मध्ये सततच्या पावसाने केळी व संत्र्याच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
होते. जीआर नुसार एचडीएफसी विमा कंपनीने दि. १५/०९/२०२३ पर्यंत विमा रक्कम देणे अनिवार्य होते. नापिकीच्या काळात शेतकन्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहणे करीता पिक विमा शासनाकडून राबविल्या जातो. मूळ हेतुची कंपनीकडून पायमल्ली होत आहे. दि. १५/०९/२०२३ पासून बँकेच्या नुसार व्याजासहीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करावी.
उपरोक्त सर्व मागण्यांकरीता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांचेसह अकोला जिल्हा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपोषणास अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवसैनिक उपोषणास बसले आहे.