जिल्ह्यात शिवसेनेच्या ऊबाठा गटाला भगदाड!
श्रीरंग दादा पिंजरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र!
अकोला जिल्ह्या हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जात होता या बालेकिल्ल्यात तेव्हा अनेक शिवसेनेचे आमदारांची वर्णे लागली होती यामध्ये गुलाबराव गावंडे, रामा कराळे, गजाननराव दाळु गुरुजी, डॉक्टर जगन्नाथराव ढोणे, पासून तर आजच्या गोपीकिशन बाजोरिया, विकल्प बाजोरिया, पर्यंत अनेक आमदारांनी विधानसभेचे सूप वाजविले आहे. जिल्ह्याला शिवसेनेचे मोठे परंपरा लाभलेले आहे.
मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात शिवसेनेचे अंतर्गत गटबाजी सुरू झाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री च्या कार्यकाळात ही गटबाजी उफाळून येऊन जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा दुसरा गट निर्माण करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आव्हान दिले तेव्हा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले अनेक मोठे नेते मंडळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या अनेक नेत्यांनी येणाऱ्या काळाची वाट बघत तक धरली यामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी जिल्ह्यात होती आता मात्र जिल्ह्यात शिवसेनेला नवी उभारी आणून पश्चिम विदर्भात शिवसेनेची भगवी पताका डौलाने फडकवणारे जेष्ठ नेते व माजी उपमहापौर श्रीरंग दादा पिंजरकर आपल्या अनेक दिग्गज सहकार्यासमवेत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे श्रीरंग दादा पिंजरकर यांनी या जिल्ह्यात शिवसेनेचे पाळेमुळे रुजवली अशा रुजवणाऱ्यापैकी श्रीराम दादा हे एक नेते होते. असे बोलले जाते मात्र श्रीरंग दादाच्या नेते पदाला झराळी मिळत नव्हती मात्र एकनाथ शिंदे च्या शिवसेनेत सहभागी झाल्यामुळे जिल्ह्याला नवे स्थान जोमाने मिळणार असल्याचेही या संदर्भात बोलल्या जात आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्रीरंग दादा पिंजरकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे वर्षा निवासस्थानी दिग्गज नेत्यांनी पक्षप्रवेश घेतला त्यामध्ये गजानन पावसाळे.बादलसिंग ठाकुर,संतोष अनासाने.बजरंग पाटील उजाडे. कुणाल पिंजरक. पप्पू चौधरी. संदिप पत्की. रामेश्वर पवळ शेकडो कार्यकर्त्यांनी ऊबाठा गटाला जय महाराष्ट्र केला आहे.