अकोला महानगरपालिका व्दारा महान जलशुध्दी केंद्र येथे साजरी करण्यात आली जल दिवाळी.
अकोला दि. 7 नोव्हेंबर 2023 – शासनाव्दारे DAY- NULM व AMRUT 2.0 च्या संयुक्त विद्यमाने अकोला महानगरपालिकेमार्फत Women For Water, Water For Women Campaign अभियान राबविण्यात आले असून याची सुरूवात आज दि. 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता अकोला महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय येथून NULM अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बचतगटातील 50 महिलांची WTP (जल शुध्दीकरण प्रकल्प, महान) या ठिकाणी भेट देण्यासाठीच्या बसरूपी रथाला मनपा उपायुक्त प्रशासन गीता वंजारी, उपायुक्त विकास गीता ठाकरे, शहर अभियंता नीला वंजारी यांच्या व्दारे हिरवी झेंडी दाखविण्यात आली. महान येथे पोहोचल्यानंतर महान जलशुध्दी केंद्र येथे शहर अभियंता यांच्याव्दारे सर्वांचे स्वागत करण्यात आले. नंतर अभ्यासक्रमासाठी आलेल्या सर्व महिलांना जलप्रदायचे अभियंता नरेश बावणे यांच्या व्दारे जलशुध्दी केंद्र येथे पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते शुध्दीकरण करून पिण्यास योग्य करणे, पाण्याची गुणवत्ता राखण्याच्या पध्दती ईत्यादी बाबत तसेच दैनंदिन वापरामध्ये पाण्याची बचत करणे संदर्भात विस्तृत माहिती प्रत्यक्ष व एल.ई.डी. स्क्रीनच्या माध्यमाने पी.पी.टी. द्वारे होणा-या प्रक्रियाबाबत माहिती देण्यात आली. या अभ्यास दौ-या दरम्यान महिला बचत गटातील महिला सदस्यांनी जलशुध्दीकरण केंद्रावर पाण्यावर होणारी सर्व प्रक्रिया प्रत्यक्षरित्या पाहून सदर प्रक्रियेमधील तांत्रिक बाबीसुध्दा जाणून घेतल्या.
जलशुध्दीकरण माहितीवर आधारित प्रश्न पत्रिका देउन उपस्थित महिलांची औपचारिकरित्या चाचणी घेण्यात आली, त्यामधून उत्कृष्ठ तीन महिलांना टी.डी.एस. मीटर पारितोषिक म्हणून देण्यात आले. तसेच अभयासदौ-या मधील सहभागी सर्व महिलांना जलदिवाळी उपक्रमाच्या अनुषंगाने हॅण्ड बॅग, स्टील बॉटल, आणि स्टीलचा ग्लास, जल दिवाली माहिली पत्रक भेट वस्तू म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमात मनपा उपायुक्त गीता वंजारी, गीता ठाकरे आणि शहर अभियंता नीला वंजारी यांनी पाण्याचे मोल, पाण्याचा वापर, पाण्याची बचत, पाणी वाचविण्याची गरज आदिंबाबत मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नोडल अधिकारी संजय राजनकर यांनी केले तसेच या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे, एन.यु.एल.एम. विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर, गणेश बिल्लेवार, जलप्रदाय विभागचे अभियंता शैलेश चोपडे, आशिष भालेराव, महिला बचत गटाच्या पदाधिकारी यांचेसह जलप्रदाय विभाग आणि एन.यु.एल.एम. विभागाचे कर्मचा-यांची उपस्थिती होती.