पातुर तालुक्यातील ग्रामपंचायत चा निकाल जाहीर
पातुर तहसील अंतर्गत कोसगाव या ग्रामपंचायतचा सरपंच पदाची निवडणूक तर तीन ग्रामपंचायची पोटनिवडणूक निकाल जाहीर झाला आहे.
एकूण तीन ग्रामपंचायतची पोटनिवडणूक झाली असून कोसगाव या ग्रामपंचायत ची पहिल्यादा जनतेच्या मताधिक्यांनी सरपंच पदासाठी निवडणूक झाली असून रत्नमाला श्रीकांत करवते यांची सरपंच पदी निवड झाली यांचे पॅनल विजय झाले यांच्या विरोधात असलेले कुसुम जगदेव करवते,व वंदना गजानन इंगळे यांच्या पदरी अपयश आले आहे तर पातुर तहसील अंतर्गत येणाऱ्या बाभुळगाव, मळसुर आणि शिलाऀ ग्रामपंचायत या तीन ठिकाणी पोटनिवडणूक झाली असून बाबुळगाव ग्रामपंचायत मध्ये दोन उमेदवार यांच्यात लढत होती त्यापैकी रमेश कडुबा डहाळे यांचा विजय झाला आहे,तर यांच्याविरुद्ध असणारे बधुसिंग जगदेव राठोड यांचा पराभव झाला आहे, मळसूर ग्रामपंचायत मधील दुर्गा प्रकाश कंकाळ यांचा विजय झाला असून यांच्या विरुद्ध असणाऱ्या संगीता केशव कंकाळ यांचा पराभव झाला आहे, तर शिलाऀ ग्रामपंचायत मध्ये दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे मित्र पक्ष उमेदवाराचा मोठया मताधिक्याने विजय झाला आहे शिलाऀ ग्रामपंचायत मध्ये महिला लढतीमध्ये एकूण चार उमेदवार आमने-सामने रिंगणात उतरले व प्रभाग क्रमांक सहा मधून पोट निवडणूक झाली असून यामध्ये उषा संतोष सावंत यांचा विजय झाला आहे तर शकुंतला संजय इंगळे, शबाना बेगम मोहम्मद शफीक, हकिमा बी सय्यद शेर अली यांचा पराजय झाला आहे यावेळी शिलाऀ ग्रामपंचायत मधून निवडून आलेल्या उमेदवार सौ उषा संतोष सावंत यांच्या विजयाकरिता तपे हनुमान व्यायाम शाळेचे संचालक पैलवान बालू बगाडे पंचायत समिती माजी सभापती, सर्व मित्रपक्षाचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले तर शिलाऀ ग्रामपंचायत प्रभाव क्रमांक सहा मधिल मतदार यांचे विजयी उमेदवार सौ उषा संतोष सावंत यांनी आभार मानले आहेत
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा