16 नोव्हेंबरला अकोला जिल्ह्यातील बार तसेच वाईन शॉप राहणार बंद!
बार असोसिएशनची सभा संपन्न!
दिनांक ७.११.२३ रोजी अकोला जिल्हा वाईन बार आणि बियर बार असोसिएशनची सभा हॉटेल सेंटर प्लाझा येथे संपन्न झाली. सभेमध्ये बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल पवनीकर,असोसिएशनचे मार्गदर्शक संतोषभाऊ अग्रवाल व श्रीकांतभाऊ देशमुख यांनी vat व बार मालकावर होणाऱ्या त्रासा बाबत चर्चा व मार्गदर्शन केले सचिव श्री राजेश गोसावी उपाध्यक्ष श्री गजानन तायडे,दिलीप म्हसने, बबलू ठाकूर, मार्गदर्शक काशिसेठ बहल, राजुभाऊ सहगल, मुरलीसेठ लुल्ला,चंद्रकांत पाटील, कोषाध्यक्ष श्री मनीष लुल्ला,गुड्डू चोपडे,अवी रामीधामी,भुषण इंगळे,राजुभाऊ पावसाळे,संदीप मेंगे,पुरुषोत्तम पाटील,निलेश संघवी अकोला शहरातील सर्व बार मालक व तालुक्यातील ,आकोट, तेल्हारा,बाळापूर, पातूर,मूर्तिजापूर, बार्शीटाकली,अकोला ग्रामीण तालुक्यातील बार मालक असे 135 सदस्य सभेला हजर होते. सभेमध्ये शासनाने वाढवलेल्या पाच टक्के मूल्यवर्धित करा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली . सदरच्या विषयावर चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते असे ठरले की शासनाला दिलेल्या पत्रानुसार जर मागणी मान्य झाली नाही तर दिनांक १६.११.२३ रोजी एक दिवस बार बंद ठेवून झालेल्या निर्णयाचा निषेध करण्यात यावा. याकरिता जिल्ह्यातील सर्व बारमालकांनी दिनांक १६.११.२३ रोजी अशोक वाटिका अकोला येथे आपल्या समस्त कर्मचाऱ्यासह उपस्थित रहावे. असे आव्हान अतुल पवनीकर यांनी केले, सभेचे संचालन सचिव राजेश गोसावी यांनी केले.