उबाठा शिवसेना गटाचे अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी दोन दिवसांपासून पीक विमा, अतिवृष्टीची मदत आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या विविध अडचणीच्या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहेय… मात्र शासनाने याची कोणतीच दखल न घेतल्याने, आज संतप्त शिवसैनिकांनी अकोल्यातील रिंग रोड येथील प्रधानमंत्री पीक विमा कंपनीची तोडफोड केली..मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन छेळण्याचा इशारा याआधी शिवसेनेने दिला होता, संतप्त शिवसैनिकांनी आज विमा ऑफिस मध्ये घुसून खुर्च्याची आणि साहित्याची नासधूस केली आहेय..तर मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला आहेय…