डॉ.अभय पाटील यांची चरणगांव येथील साखळी उपोषणाला भेट!

डॉ.अभय पाटील यांची चरणगांव येथील साखळी उपोषणाला भेट!

अकोला-मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पातुर तालुक्यातील चरणगाव येथे साखळी उपोषण सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक डॉ.अभय पाटील यांनी शुक्रवार ता.१० रोजी येथील साखळी उपोषणाला भेट देऊन मराठा बांधवांशी चर्चा केली.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनाला पाठिंबा देत पातुर तालुक्यातील चरणगाव या गावाने लोकप्रतिनिधींना सर्वप्रथम गावबंदी करून साखळी उपोषण सुरू केले होते.दरम्यान शासनाला दोन महिन्याचा अवधी देवून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना दिल्या.त्यामुळे चरणगाव येथील मराठा बांधवांनी सुद्धा उपोषण सुरूच ठेवले असून जोपर्यंत जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही. तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्यावर उपोषण कर्ते ठाम आहेत.दरम्यान येथील मराठा बांधवांनी गत आठवड्यात जरांगे पाटील यांची संभाजीनगर येथील रुग्णालयात जाऊन भेट देखील घेतली.दरम्यान डॉ.अभय पाटील यांनी भेट दिली असता यावेळी गरजवंत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
—————-
जरांगे पाटलांच्या सभा स्थळाची केली पाहणी.

मराठा आरक्षणाचा लढा उभा करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अकोला जिल्ह्यातील पहिली सभा चरणगाव या ठिकाणी घेणार असल्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक डॉ. अभय पाटील यांनी शुक्रवारी चरणगांव येथील सभास्थळाची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news