महामार्गावर अपघात वीस वर्षे युवती जाग्यावर ठार
संतप्त जमावाने महामार्ग रोखला
कुरण खेड- योगेश विजयकर राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक सहावर वणी रंभापुर जवळ आज दुपारी चारच्या दरम्यान टू व्हीलर आणि बस मध्ये अपघात झाला यामध्ये निपाना येथील 19 वर्षीय युवती ही जाग्यावर ठार झाल्यामुळे संतप्त जमावाने महामार्ग रोखून धरला
बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वणी रंभापुर जवळ आज दुपारी चारच्या दरम्यान बोरगाव मंजू वरून मूर्तिजापुर दिशेने येत असलेली टू व्हीलर गाडी ही वनी रंभा थांब्यावर उभी असताना मागून येणाऱ्या भरधाव हिंगणघाट आगरच्या अकोला हिंगणघाट गाडी क्रमांक एम एच १३ सी यु ८१७८ या गाडीने टू व्हीलर ला जबरदस्त धडक दिल्यामुळे टू व्हीलर वरील निकिता चंद्रकांत राऊत वय २१ रा निपाना तिचा मृत्यू झाला तर टू व्हीलर चालक चंद्रकांत दयाराम राऊत रा.निपाना हे गंभीर जखमी असून यांना अकोला येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या ठिकाणी नागरिकांनी या अगोदर सुद्धा भुयारी मार्गाची मागणी केली होती या ठिकाणी चौफुली असून निपाणा जाण्यासाठी हा महामार्ग खूप महत्त्वाचा आहे महामार्गाच्या चुकीच्या धोरणामुळे येथे आजपर्यंत अनेक अपघात घडले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संतप्त जमावाने महामार्ग रोखून धरला आहे यामध्ये अकोला व मुर्तीजापुरच्या साईटला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशन, माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत