ऊबाठा गटा तर्फे मायेचा आधार देत आत्महत्याग्रस्त शेतकरी व मजुरांना जीवन आवश्यक साहित्याचे वाटप!
पातूर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर 300 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप आज ऊबाठा गटाच्या वतीने मायेचा आधार देत आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना साडीचोळी तसेच जीवन आवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. नेहमीच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेना मदत करत असते तसेच मागील वर्षी सुद्धा आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेने मदत केली होती असे प्रतिपादन आमदार नितीन देशमुख यांनी सत्य लढा सोबत बोलताना सांगितले आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील प्रज्ञाताई सरकटे म्हणाल्या की आमदार नितीन देशमुख हे आमदार नसून माझे भाऊ आहेत. ते नेहमीच आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला च्या पाठीमागे एका भावासारखे सदैव पाठीशी उभे असतात अशी भावना प्रज्ञा ताईंनी भावूक होऊन बोलताना आपली भावना व्यक्त केली. यावेळी बाळापुर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख. गजानन दारू गुरुजी. गोपाल दातकर. हरिदास राजेश मिश्रा.अनिरुद्ध देशमुख.राहुल कराळे.ऊबाठा गटाचे शिवसैनिक त मोठ्या संख्येने उपस्थित होते.