कोसगाव येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
पातूर तालुक्यातील आदिवासी बहुल कोसगाव या गावांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व अखिल भारतीय मराठा महासंघाचा अमरावती विभागाचा अध्यक्ष व श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचा अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमास उपस्थित राहता आलं. या कार्यक्रमासाठी नागपूर येथील शासकीय मुद्रणालय येथील अधिकारी माननीय वाघमारे साहेब तसेच कोसगाव येथील तंटा मुक्तीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच, तसेच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सर्व सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य अध्यक्ष, उपाध्यक्ष,गावातील नागरिक, पुरुष, महिला, बालक व बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी श्री वाघमारे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बीएसएनएलचे निवृत्त अधिकारी श्री करवते साहेब हे होते या प्रसंगी श्री रामकुमार अमानकर, जगदीश करवते याची समयोचित भाषणे झालीत . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रघुनाथ करवते यांनी केले. याप्रसंगी आदिवासी समाजाबद्दल सर्व वक्त्यांनी गौरोदगार काढलेत. आदिवासी समाज हा कष्टकरी व प्रामाणिक असल्याचे सर्व वक्त्यांनी प्रतिपादन केले.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा