डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर यांची आदीवासी बांधवासोबत भाऊबीज साजरी…

डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर यांची आदीवासी बांधवासोबत भाऊबीज साजरी…

सातपुड्याच्या कुशीत असलेला आदीवासी समाज हा फार कष्टकरी, मेहनती समाज आहे. कष्ट आणि श्रमातुन वेळ काढून ही मंडळी सर्व धार्मिक सण उत्सव पारंपरिक रीतीने साजरे करीत असतात. अशा आदीवासी श्रमिकांच्या जीवनात आनंदाचे चार क्षण फुलवणे हे माझे भाग्य समजते, असे भावनिक उदगार प्रदेश काँग्रेसच्या सचिव डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी व्यक्त केले.
13 नोव्हेंबर रोजी आदीवासी ग्राम वसाडी येथे आदीवासी बांधवासोबत भाऊबीजेचा सण साजरा करतांना त्या बोलत होत्या. साला बादा प्रमाणे यावर्षी सुध्दा दिवाळी च्या दुसऱ्या दिवशी संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल ग्राम वसाडी येथे आदीवासी बांधवासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर ह्या सातपुड्याच्या कुशीतील आदीवासी भाऊ, बहीणीसोबत भाऊबीज साजरी करीत असतात. यावर्षी सुध्दा वसाडी येथे पोहचताच आदीवासी बांधवानी त्यांच्याभोवती गर्दी केली. बोलतांना वसाडी येथील बांधवांचे मन गहिवरून आले होते.
या भाऊबीज कार्यक्रमाला बहुसंख्य आदीवासी बांधव उपस्थित होते. यावेळी साडी,शेला,टोपी,नारळ व फराळ देवुन भाऊबीज साजरी केली.
यावेळी आदीवासी बाल गोपाळासोबत अल्पोपहार सुद्धा घेतला. यावेळी बालगोपालाच्या चेहऱ्यावरचे हसु व मोठ्याच्या डोळ्यांतील आंनद मनाला मानसिक समाधान देवून जात होते.
या कार्यक्रमाला वसाडी संरपच समजकौर, उपसरपंच कपिल पालकर, ज्येष्ठ नेते हुसेन पालकर, सिकंदर भाई, झामसिंग झुलिया, डॉ.संदिप वाकेकर, रमेश लोणकर, धर्मेंद्र इंगळे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत गावंडे, संतोष टाकळकर, दिपक भटकर, दिपक गव्हादे, अशोक पालकर, जुनेद शेख, धर्मेंद्र इंगळे, राजेश बोदडे, गण्णीभाई, डोंगरसिंग, हरिशचंद्र बिबेकर, प्यारसिंग मुजालड़ा, नारायण कासदेकर, भारत पालकर, श्यामलाल कासदेकर, माणिक चव्हाण, पंकज तायडे, संजय घाटे, विशाल सातव, सागर उगले, अनिल इंगळे, नितीन जाधव आदी उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news