पत्रकारांची बदनामी करणाऱ्या डॉ.पांडुरंग हटकर विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, पत्रकारांनी दिले निवेदन
खामगाव:मागील ४ ते ५ दिवसांपासून काहीही कारण नसताना खामगाव शहरातील स्त्रिरोगतज्ञ डॉ. पांडुरंग गुलाबराव हटकर यांनी अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप तसेच पत्रकार बांधवांना वैयक्तीकरित्या तसेच स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर व फेसबूकवर दैनिक सत्यप्रतचे संपादक आनंद गायगोळ यांची तसेच पत्रकारांची बदनामीकारक मजकूर टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न चालविला आहे.त्या बोगस पत्रकाराच्या दिवाळी पॉकीटाची चर्चा ! दिवाळी भेट दिली नाही म्हणून बदनामीकारक वृत्त प्रसिध्द केले, पत्रकार आनंद गायगोळ विरूध्द डॉ. पांडुरंग हटकर यांची तक्रार अशा मथळ्याखाली बातमीस्वरूपात पोस्ट तयार करून सोशल मिडीयाचा गैरवापर करीत पत्रकारांच्या बदनामीचा प्रयत्न केला आहे. याशिवाय पत्रकारांच्या बाबतीत बराचसा चुकीचा व बदनामीकारक मजकूर टाकण्यात आला आहे. त्यांनी व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये नमुद मजूकर पुर्णपणे खोटा असून वास्तविक पाहता पत्रकार आनंद गायगोळ हे दिवाळी जाहीरातसाठी डॉ.हटकर यांच्याकडे कधीही गेलेल नाहीत. तसेच डॉ.हटकर यांची कोणतीही बातमी त्यांनी प्रकाशित केली नाही.
परंतु तरी सुध्दा डॉ.हटकर हे बदनामीकारक पोस्ट व्हायरल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार असून याचा आम्ही निषेध करतो तसेच भविष्यात देखील डॉ. हटकर यांचेकडून सोशल मिडीयाचा गैरवापर करून गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होवू शकतो याची देखील दखल घ्यावी.सोशल मिडियाचा गैरवापर करून पत्रकारांची बदनामी करणार्या डॉ.पांडुरंग गुलाबराव हटकर यांची चौकशी करून त्यांच्याविरूध्द सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा पत्रकारा बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.अश्या आशयाचे निवेदन आज विनोद भोकरे,आनंद गायगोळ,मोनू शर्मा,अनुप गवळी,आकाश पाटील, नितेश मानकर, मुबारक खान,योगेश हजारे, श्रीधर ढगे, मोहन हिवाळे, आकाश शिंदे, संतोष करे ,विकास कुलकर्णी ,ईश्वर ठाकूर, आशिष पवार,विनायक देशमुख, शिवाजी भोसले, महेंद्र बनसोड,अमोल गावंडे,कृष्णा जवंजाळ, कुणाल देशपांडे, निखिल देशमुख,किरण मोरे,अनिल घोडके,रुपेश कलंत्री, महेश देशमुख, सुनील गुळवे,शरद देशमुख,देवेंद्र ठाकरे,धनंजय वाजपेयी,सुमित पवार, मिर्झा अकरम बेग सह मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहून निवेदन दिले.निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक,अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी,सायबर विभाग,व खामगांव शहर ठाणेदार यांना देण्यात आल्या.