श्रीनाथ वृद्धाश्रमात माणुसकी फांऊडेशन कडुन भाऊबीज साजरी.
`माणुसकी फाऊंडेशन , अकोला’ तर्फे या वर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने बुधवार दिनांक 15/11/23 श्रीनाथ वृद्धाश्रम, दहिगाव, तेल्हारा* येथे पार पडलेल्या कार्यक्रमास आपुलकी व जिव्हाळ्याने आपण सर्वांनी सद्भावनेतून माणुसकी जपली, आमच्या छोट्याश्या हाताला आपण सर्वांनी गगनचुंबनी असे बळ दिले. आमच्या पाठीशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे उभे राहून गरजू, वृद्धांना मदत करण्यास पाठींबा दिल्या बद्दल आम्ही माणुसकी फाऊंडेशन तर्फे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो व या पुढे पण आपण अशी साथ व प्रोत्साहन द्यावे ही अपेक्षा करतो.
या वेळेस श्रीनाथ वृद्धाश्रम मधिल आजीं आजोबांना ना भाऊबीज म्हणून नवीन लुगडी,साडी वाटप तर आजोबांना नवीन कपडे, दुप्पटे, व सर्वाना तसेच दिवाळीचे फराळ व मिठाई वाटप करण्यात आले. आजी आजोबांच्या समस्या, त्यांना येणारी अडी-अडचणी, औषधी व रोजच्या गरजूच्या वस्तूची विचारपूस करण्यात आली.
ज्या आई बाबांनी आपल्या साठी आपले आयुष्य पणाला लावून आपल्याला लहाण्याचं मोठं केलं अश्या आई बाबांना उतरत्या वयात त्या मुलांनी आश्रमात नेऊन सोडले हे जितकं ऐकण्यासाठी जड आहे त्याही पेक्षा त्यांची व्यथा पाहण्यास ही,,,
प्रत्येक वेळेस सारखे या ही वेळेस माणुसकी फाऊंडेशन ने आपली माणुसकी जपत वृद्ध आजी आजोबांना सुद्धा *दिवाळी सारखा सण साजरा केला.
या कार्यक्रमाला श्री भवानी प्रताप यांचे मार्गदर्शन लाभले. तर वृद्धाश्रम चे संचालक श्री विजय धरमकार यांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माणुसकी फाऊंडेशनचे शिलेदार
श्री. डॉ. बबनराऊत काका, श्री. मोहन दत्तात्रय मांडवकर,श्री. बाळू देशमुख,
श्री. शक्ती किसनराव अंबुसकर, श्री गणेश वाकोडे,
श्री. दिनेश झाडे,
श्री. विशाल भास्करराव इंगळे, श्री. मिलिंद भगवान खिराडे, श्री. विशाल वसंतराव गावत्रे, श्री. संतोष एकनाथ चिलवंते,
श्री. नितीन वानखडे, श्री. हर्षद राऊत,
श्री. आशिष मखराम चव्हाण,
श्री. आनंद बहुरुपे , श्री. आकाश भुसे, श्री. सारंग हिंगोलीकर,
श्री. हरीष खाडे, श्री.प्रविण पवाने, श्री. वैभव मांडवकर,
चि. वेदांत विशाल गावत्रे,
सौ. मंगला राजेश अलोने,
सौ. रिना गणेश वाकोडे,
कु. परी गणेश वाकोडे, सौ. मिना बबनराव राऊत, सौ. वैष्णवी हर्षदराव राऊत, सौ. पूजा चेतनराव बार्डे, कु. वैष्णवी हिंगोलीकर,सौ. कोमल हरीष खाडे,
यादी जण उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री रवि अंभोरे यांनी तर आभार प्रदर्शन सौ.मंगलाताई अंलोने यांनी केले…
अशी माहिती शक्ती अंबुसकर यांनी दिली..