जालना, औरंगाबाद, नाशिक, कल्याण मार्गे नांदेड -पनवेल-नांदेड दिवाळी विशेष गाड्यांच्या आणखी दोन फेऱ्या
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने जालना, औरंगाबाद, नाशिक, कल्याण मार्गे नांदेड-पनवेल-नांदेड दिवाळी विशेष गाड्यांच्या आणखी दोन फेऱ्या चालविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे —
01. नांदेड-पनवेल विशेष गाडी : गाडी क्रमांक 07625 नांदेड ते पनवेल विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 20 नोव्हेंबर, 2023 ला रात्री 23.00 वाजता सुटेलआणि पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, नगरसोल, अंकाई, मनमाड, नासिक, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 12.20 वाजता पोहोचेल.
02. पनवेल-नांदेड विशेष गाडी : गाडी क्रमांक 07626 पनवेल ते नांदेड विशेष गाडी पनवेल येथून दिनांक 21 नोव्हेंबर, 2023 ला दुपारी 13.20 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 04.00 वाजता पोहोचेल.
या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल असे एकूण 20 डब्बे असतील.