वंचित बहुजन महिला आघाडी च्या पोलिसांशी संघर्षाअंती आरोपिवर बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल..
अकोला दि १७ खदान पोलिस स्टेशन अंतर्गत कैलास टेकडी येथील रहिवासी पोलिस स्टेशन ला दुपारी ५.०० वाजता आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचाराची फिर्याद घेऊन आला. त्यांना वंचित च्या पदाधिकारी यांनी नैतिक बळ आणि अभय देण्यासाठी पोलिस स्टेशन गाठलं. पण पोलिस प्रशासन दिरंगाई ने कारवाई करत होती.
मुलीचे बयान घेताना आरोपी गणेश कुंभरे यानी पोलिस स्टेशन मध्ये मुलीला व तिच्या वडीलांना धमक्या दिल्या त्यावर संतापुन वंचित बहुजन महीला आघाडी प्रदेश महासचिव अरूंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जि प सदस्य पुष्पाताई इंगळे,जि प सदस्य आम्रपाली खंडारे, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, यांची पोलिस अधिकारी यांच्याशी कारवाई तील दिरंगाई बाबत चांगलीच शाब्दिक चकमक झाली. आणि नंतर कारवाई ला गती आली.युवा अध्यक्ष आशिष मांगुळकर, सचिन शिराळे, गजानन दांडगे, सुनंदाताई चांदणे, उपस्थित होते.
सदर १२ वर्षीय मुलीचे मागील दोन वर्षांपासून धाकदपट आणि धमक्या देऊन आरोपिकडुन लैंगिक अत्याचार करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी तिच्या हातात सिगारेट चे चटके देण्यात आले, तिचे केस कापुन तिचे मुंडण करुन हा आरोपी थांबला नाही तर तिला स्मशानभूमीत विवस्त्र करण्यात आले एवढा मोठा प्रकार झाल्यावर सुध्दा पोलिस प्रशासन दिरंगाई करत होती,
आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्ती चा असल्याने त्याच्या विरोधात कोणी ही त्या कुटुंबाला आधार देण्यास तयार नव्हते.
प्रसंगाचे भान ठेवून वंचित बहुजन महीला आघाडीने पुढाकार घेत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस प्रशासनाशी संघर्ष करुन गुन्हा दाखल करून घेतला हे महत्त्वाचे…