अकोट फाईल परिसरात आपसी वादातून तणाव पूर्व शांतता!
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासन!
अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भीम नगर चौक तसेच कुरेशी चौक परिसरात आपसी वादातून तेढ निर्माण झाला आहे
प्राप्त माहितीनुसार आज सायंकाळी साडेआठच्या सुमारास एका मद्यपी व्यक्तीने भीम नगर परिसरात शिवीगाळ केल्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. आपसी वादातून दगडफेक करण्यात आली दगडफेकीची माहिती मिळताच अकोट फाइल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली घटनेची माहिती वरिष्ठांना देताच घटनास्थळी ॲडिशनल एस. पी. अभय डोंगरे. एस. डी. पी. ओ. सुभाष दुधगावकर. यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अकोट फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू हे करीत आहे. सध्या परिस्थिती निमंत्रणात असून हा आपसी वाद असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान अकोट फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी केले आहे.