मोहन भागवत यांनी घेतले श्रींचे समाधीचे दर्शन 2024 मध्ये आयोध्यातील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत हे देशातील प्रमुख देवस्थानांना देत आहे भेटी….
राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत यांनी संतनगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या संस्थांना भेट देऊन श्रींच्या समाधी दर्शन घेतले.
येत्या 22 जानेवारी 2024 मध्ये आयोध्यातील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत हे देशभरातील प्रमुख देवस्थानांना भेटी देत .तेथील प्रमुख विश्वस्तांची संवाद साधत असल्याची माहिती आहे.
शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये सरसंचालक मोहन भागवत यांच्या आगमना निमित्ताने शहरात तसेच श्री संस्थान परिसरात चौख बंदोबस्त होता.
सरसंघचालक मोहन भागवत यांचे आगमन पार्श्वभूमीवर सनई चौघडा टाळ मृदंगाच्या निनादात ब्रह्म वृंदांच्या हस्ते संस्थांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मंत्र उपचारात औक्षण करण्यात आले . श्री संस्थांकडून सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांनी त्यांचा सत्कार केला .यावेळी श्री संस्थान कडून राबविण्यात येत असलेल्या लोकउपयोगी उपक्रमाची माहिती त्यांनी जाणून घेतली. या उपक्रमाचे मोहन भागवत यांनी कौतुक केले.