पातूर तालुक्यातील खानापूर रहिवासी गोविंदा महाराज समाधीस्थ
गोविंदा महाराज अवलिया रुपी संतांचे प्रतिक आज काळाच्या पडद्याआड
पातूर तालुक्यातील खानापूर रहिवासी अवलिया रुपी गोविंदा महाराज संतांचे प्रतिक म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्म गोमासे परिवारात झाला होता आणि अनेकांना त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनूभव आलें आणि खानापूर येथील दाट जंगलात त्यानी महादेवाचे मंदिर येथे आपले जीवन संतरुपी भक्त म्हणून जगले अशातच त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण परिसरात पसरली व एक वेळ त्यांच्या दर्शनासाठी भक्तांचा सागर उमळला व जंगल परिसरात यात्रा उत्सव सूरू झाली परंतु कालांतराने गोविंदा महाराज हे जंगलात भटकत असताना काही काळ ते भक्तांच्या नजरेआड झाले व त्यांना माननारा भक्त वर्ग पंचक्रोशीत आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती आज त्यानी शरीराचा त्याग करून शेवटचा निरोप घेतला व खानापूर येथील भक्तांनी त्यांना समाधी दिली व भजन कीर्तन च्या गजरात गोविंदा महाराज यांना शेवटचा निरोप दिला.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा