हिवरखेड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

हिवरखेड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा

हिवरखेड येथील अली क्लिनिक मध्ये रविवार 27 नोव्हेंबर 2023 रोजी निशुल्क भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार चे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर सय्यद वाजिद अली यांनी आयोजित केलेल्या सदरहू शिबिराचे कार्यक्रमात अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष संग्रामभाऊ गावंडे शिबिराचे उद्घाटक संजय ज्ञानदेवरावं गिऱ्हे सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक प्रदीप ढोले सर रामभाऊ म्हैसणे राजू भाई खान हे लाभणार आहेत.
शिबिरात मधुमेह मेंदू रोग किडनी श्वसन विकार तज्ञ डॉक्टर ऋषिकेश येऊल नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शत्रुघ्न जाधव होमिओपॅथी चे डॉक्टर असलम अली डॉक्टर शहजाद खान हे डॉक्टर रुग्णांची तपासणी करतील. मोफत आरोग्य शिबिरात आपली नाव नोंदणी करण्याकरता शिबिराचे आयोजक डॉक्टर सय्यद वाजीद अली तसेच धनंजय गावंडे अवेज खान मुजाहिद अली विकास गायकी पाटील सय्यद वकार अली नाशिद अली शेख शहजाद यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अली क्लिनिकचे संचालक डॉक्टर सय्यद वाजिद अली यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news