मनपाव्दारा नायगांव येथील डम्पींग ग्राउंडच्या जागेमधील अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई.
अकोला दि. 22 नोव्हेंबर 2023 – आज दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये उत्तर झोन अंतर्गत नायगांव येथील डम्पींग ग्राउंडच्या जागेमधील अतिक्रमणावर उत्तर झोन कार्यालय आणि मनपा अतिक्रमण विभागाव्दारे निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत उत्तर झोन क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आयुक्त विठ्ठल देवकते, सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, कनिष्ठ अभियंता अक्षय बोर्डे यांचेसह अतिक्रमण विभागातील तसेच अभिकर्ताचे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.