उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा दौरा
अकोला, दि. २२ : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील उद्या गुरुवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी अकोला दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे: दि. २३ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अकोला येथे सायंकाळी ७ वाजता आगमन, सायं. ७ वा. स्व. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी आगमन व त्यांच्या कुटुंबियांसमवेत सांत्वनपर भेट,
सायं. ७.३० वा. रणपिसेनगरकडे प्रयाण, सायं. ७.४५ वा. माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, रा. ८ वा. होलिक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलकडे प्रयाण, रा. ८.३० वा. आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, रा. १० वाजता राऊतवाडी येथून अमरावतीकडे वाहनाने प्रयाण.