समाधानाचं शेत कृषी पर्यटन केंद्राचा लोकार्पण सोहळा
पर्यटकांसाठी कृषी पर्यटन हा एक उत्तम पर्याय
पातूर :आजही शहरी लोकांची नाळ शेतीशी जुळलेली आहे. कधीकाळी आपलं गाव सोडून नोकरी व काम धंद्यासाठी शहरात गेलेले लोकं शहरातच रुजले. सणावाराला लग्नकार्याला गावाकडे जाणे येणे होते परंतु कामाच्या व्यापात वेळच मिळत नाही. मोठ्यांचीच ही अवस्था तर लहानग्यांची तर गावापासून नाळ तुटली. मुलांनी आपले आजोळ पाहिले पण अनुभवले नाही.शेतही पाहिली परंतु दिलखुलास हुंदडता आलं नाही ज्यांचे गाव आहे त्यांचीच ही अवस्था तर शहरात राहणाऱ्यांची मानसिकता कशी असेल अशा सर्वांसाठी कृषी पर्यटन हा उत्तम पर्याय शोधून काढला पातुर मधील महिला उद्योजीका माधुरी ढोणे यांनी.
माधुरी ढोणे यांनी सुरू केलेल्या समाधानाचं शेत ऍग्रो टुरिझम सेंटरचा नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला असून अकोला वाशिम महामार्गावर असलेल्या समाधानाचं शेत ऍग्रो टुरिझम सेंटरमध्ये शेतावर येणं,राहणं, शेतातील पीकपाण्याची माहिती घेणे, सोपी सोपी काम स्वतः करून पाहणं शेतकऱ्यांचे जीवन अनुभवणे ग्रामीण संस्कृती समजून घेणे यासह विविध शेती अवजारे, लहान मुलांसाठी खेळणे, पोहणे,घोडसवारी, रेन डान्स, यासह राहण्याची व जेवनाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे.
या कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शैक्षणिक संधी दिली जाते,शेत जमीन व आपली संस्कृती जतन करण्यास मदत होते यासाठी दररोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनापासून थोडा वेळ काढून कुटुंबातील थोरामोठ्यांनी समाधानाचं शेत ऍग्रो टुरिझम सेंटरला भेट देऊन आपली कृषी संस्कृती अनुभवावी असे आवाहन समाधानाचं शेत कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका माधुरी ढोणे यांनी केले आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा