अकोला पातुर हैदराबाद मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच
महेंद्रा बोलेरो प्रवासी वाहन आदळले दिशादर्शक भिंतीवर
दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली
पातूर नव्याने अकोला हैदराबाद मार्गाचे काम सुरू आहे परंतु मुख्य रस्त्याच्या बाजूला आलेल्या इलेक्ट्रिक खांब व रोड क्रॉसिंग तारांमुळे काही ठिकाणचे कामे रखडले आहेत त्यामुळे पातुर शहरा लागत असलेला बायपास या रोडला दिशादर्शक भिंती आडव्या लावलेले आहेत व त्या भिंतीवर रेडियम चे दिशादर्शक चिन्हे रेखाटलेले आहेत तरी सुद्धा रोडवर नव्याने येणारे वाहनांची दिशाभूल होत आहे व अकोल्याहून निघणारे वाहन हे सुसाट गतीने निघतात परंतु रोडची कामे रखडली असल्याने दिशा भिंती काही ठिकाणावर आडव्या ठेवण्यात आलेले आहेत काही दिवसांपूर्वी अकोल्यातील एका युवकाचा मोटारसायकल चा या भिंतीला धडक दिल्याने मृत्यू झाला होता या ठिकाणी काल उशिरा रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी एमपी येथील वाहन MP 04 BC 5281 क्रमांक बोलेरो प्रवासी वाहन असलेली अकोल्यावरून सात ते आठ कामगारांना घेऊन नांदेड ला जात असताना पातुर जवळील सबस्टेशन लगत उड्डाणपूला जवळ असलेल्या दिशाफलक भिंती वर प्रवासी वाहन धडकले परंतु सुदैवाने या मंध्ये जिवित हानी झाली नाही हि संपूर्ण माहिती वृत्त लिहीपर्यंत मिळाली व पुढील तपास पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा