महान येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात आदिवासी महिला रुग्णाला असभ्य वागणूक
महान येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात आदिवासी महिला रुग्णा सोबत असभ्य वागणूक प्रकरण झाले असून महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग अंतर्गत तळागाळातील जनतेपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्या म्हणून नेहमी प्रयत्नशील असते त्यासाठीच आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्यवर्धिनी जिल्हा रुग्णालय आहेत परंतु याला काही कर्मचारी गालबोट लावून आरोग्य विभागाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत महान येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात आदिवासी महिला आरोग्य तपासणीसाठी गेली असता त्यांना तेथील सिस्टर कडून असभ्य वागणुकीचा सामना करावा लागला त्या कारणाने आदिवासी समाजातील ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांना कळताच बिरसा उलगूलआन सेनेचे जिल्हाध्यक्ष विलास धोंगडे, यांच्या मार्गदर्शनाखाली बिरसा उलगुलान सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा रुग्णसेवक प्रहार जनशक्ती पक्ष अकोला किशोर हजारे, बंडू राठोड, संदिप माळकर, संतोष लोखंडे राजकुमार संसाने, रमेश कदम यांनी निवेदनाच्या माध्यमातून निलंबनाची मागणी वरिष्ठ अधिकारी एनओ डॉ के एम साबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर कराळे यांना करण्यात आली या निवेदनावर काय कारवाई करणार या कडे महान परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे प्रतिनिधी सत्य लढा