अकोला, दि. २४ : अकोला जिल्ह्यात दि. २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडेल, अशी शक्यता नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे.
वीज व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी साठवुन ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल आणला असल्यास सदर मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.