मनपातील निलंबित मुख्याध्यापकांवर अन्याय!
उच्चस्तरीय समिती बसविण्याची मागणी!
जिल्हा लेखा परीक्षक वर्ग एक अंतर्गत येत असलेल्या सहकारी सस्थेचा भोंगळ कार्यभार!
विनायक तायडे यांच्यावर पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल असताना फरारी असताना केली अनेक प्रकार!
अकोला:-जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग एक अंतर्गत असलेल्या कार्याल्यातील लेखापरिक्षक असलेला विनायक तायडे यांच्यावर सिविल लाईन पोलीस स्टेशन ला पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल असताना विनायक तायडे हे 4 एप्रिल 2022 ते 7 जुलै 2022 पर्यंत फरार होते परंतु फरार काळात असल्यावरही या बहाद्दराने मनपा आयुक्त यांच्याकडे येऊन तक्रार केली यासाठी आयुक्त कार्यालयातील लिपीकाने आयुक्तांची दिशाभूल करत आपले उखळ पांढरे करुन घेतले.यामुळे मनपातील आठ कर्मचाऱ्यांना नौकरीतून कमी करण्यात आल्याने ते आणी त्यांच्या परिवारावर दुखांचा डोंगर कोसळला आहे.
फरारी मध्ये असलेल्या आरोपीकडून मनपा आयुक्त कार्यालयातून चालली टिप्पणी! वर शंका उत्पन्न होत आहे.
अकोला शहर मनपा शिक्षक समृद्धी कर्म सहकारी पत संस्था चे 12 ते 17 या कालावधीचे लेखापरीक्षक जिल्हा उपनिबंधक लोखंडे यांनी संस्थेचे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये सुरू असताना तसेच संस्थेच्या कार्यालयातून संस्थेचे 2014 ते 16 या कालावधीचेअकोला शहर मनपा शिक्षक समृद्धी कर्म सहकारी पत संस्थेचे रेकॉर्ड चोरीला गेली असल्याची तक्रार रामदास पेठ पोलीस स्टेशनला दिली असताना तसेच लेखा परिक्षक तायडे याने जिल्हा विषेश उप निबंधक सहकारी संस्था तसेच तालुका उपनिबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हा विशेष लेखा परिक्षक यांच्याकडे पत्र देऊन, खोटे दस्तावेज तयार करून संस्थेचे चाचणीत लेखापरीक्षण खोटा अहवाल तयार करून मनपा शिक्षक पत सस्थेत असलेल्या सदस्यांवर खोटा आरोप करत गुन्हे दाखल केले.या कार्यालयातील रेकार्ड कुमारी अर्चना सहारे यांच्याकडे होते. तायडे यांनी त्यांच्याकडून महिला कर्मचारी असल्याचे तसेच त्यांची तब्येत ठीक राहत नसल्याचे लिहून घेऊन 14 जानेवारी 2020 ला तत्कालीन जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांच्याकडून अर्चना सहारे यांचा आदेश रद्द करून स्वतःचा आदेश करून घेतला.
संस्थेचे लेखापरीक्षण सुरू करताना चाचणीत लेखापरीक्षण फि च्या नावाखाली संस्थेकडून साठ हजार रुपये विक्रम बन्ने यांच्या नावाने बेरार चेकद्वारे घेतले व त्याची चालान आणून देतो असे सांगितले परंतु तायडे यांनी पावती आणून दिली नाही. म्हणून संस्थेच्या व्यवस्थापकांनी तायडे यांना नोटीस दिली परंतु नोटीस घेऊनही त्यांनी चालान न आणून दिल्यामुळे अकोला शहर मनपा शिक्षक समृद्धी कर्मचारी संस्था यांनी जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग एक यांच्याकडे अध्यक्षांनी तक्रार दिली त्याची चौकशी तायडे यांचे वरिष्ठ अधिकारी बनचरे यांच्याकडे देण्यात आली असता साठ हजार रुपयांची चाचणी लेखापरीक्षांच्या नावाखाली कोणतीही फसवणूक केली नसल्याचे व रेकॉर्ड गहाळ झाले नसल्याचे 29 मार्च 2022 च्या अहवालामध्ये नमूद आहे. यावर संस्थेचे व्यवस्थापक प्रफुल भवते यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली अशी कुठलीही कारवाई झाली नाही. म्हणून त्यांनी न्यायालयात जाऊन लेखा परिक्षक विनायक तायडे तसेच प्रामाणित लेखापरीक्षक संदीप सकळकळे व विक्रम बन्ने यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाने रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये 420,470.471.120 ब.201.34. इतर कलमाने दिनांक 10 ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला त्याप्रमाणे पुढील कारवाई सुरू असताना या अगोदर 4 एप्रिल 2022 रोजी विनायक तायडे व विक्रम बन्ने यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन सिव्हिल लाइन्स येथे पोक्सोचा दाखल असताना जामीन मिळाला नसताना तीन महिने फरारीत असताना अशा कालावधीमध्ये दिनांक 10 जून 2022 रोजी आयुक्त मनपा यांच्याकडे तायडे यांच्या कार्यालयाच्या लेटर पॅडवर निबंधकाची परवानगी नसताना व स्वतः फरारी मध्ये असताना नरेश मूर्ती निलंबित मुख्याध्यापक मनपा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्र दिले मनपा आयुक्तांनी त्याच दिवशी मनपा लेखापाल दलाल तसेच तत्कालीन मनपा शिक्षण अधिकारी शाहीन सुलताना यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई न करता नरेश मूर्ती यांचा निर्वाह भत्ता थांबवून नस्ती तयार करून आयुक्तांसमोर सादर करून कारवाई केली. आयुक्तांनी तक्रारकर्ते विनायक तायडे फरार असताना याच्यावर पोक्सो चा गुन्हा दाखल असताना आरोपीची मदत केल्याचे दिसून येत आहे. मनपा आयुक्त कार्यालयातील एका वरिष्ठ विश्वासू असलेल्या लिपीकच्या सांगण्यावरून ही कारवाई केल्या गेल्याची चर्चा मनपा वर्तुळात होत आहे. विविध कलमा खाली गुन्हे दाखल असताना तायडे हे मनपा आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन कार्यालय टिपणी तयार करण्यास सांगत होते. व त्याकरिता आयुक्त कार्यालयातील एक लिपीकच्या सहकार्याने टिप्पण्या लिहिल्या जात होत्या. लेखा परिक्षक मधील तायडे त्यांच्या डिपार्टमेंटची कुठलीही परवानगी नसताना लेटर पॅड चा वापर करून तक्रारी करीत होते. त्याकरिता मनपा आयुक्त व सहकार खात्याचे लेखापरीक्षक तायडे यांना मदत करत होते. विशेष म्हणजे तायडे चे वर्तमानपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली असताना तायडे यांच्या सहकार खात्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करता त्याना उलट सहकार्य केले असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याची चर्चा होत आहे. यांनी लेखा परिक्षक विनायक तायडे यांच्यावर विविध कलमाने गुन्हे दाखल केले असून अद्यापही लेखापरिक्षण सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आजपर्यंत यांच्यावर कुठलीही कारवाई केले नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.याचा अर्थ -लेखापरिक्षक कार्याल्यातील अधिकारी यामध्ये सामील असल्याचे दिसते यावर वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन कार्यवाही का करण्यात आली नाही याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.यावरून एका लिपीकाच्या आकसापोटी 9 कर्मचाऱ्यांना नौकरीतून मुकावे लागले यात दोन कर्मचारी टेन्शन घेत मृत पावले आहे. यासर्व प्रकारामुळे मनपात प्रशासक राज नसुन हिटलरशाही सुरूअसल्याचे दिसत आहे. यावर उच्चस्तरीय समिती बसविण्याची मागणी होत आहे.