सर्वोच्च न्यायालयाच्या तारखेनुसार मातृभूमी मराठी मध्ये व्यवसायिक प्रतिष्ठानच्या पाट्या लावा
पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण व्यवसाय धारक यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक 25 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्य मराठी मातृभूमीच्या रक्षणार्थ व्यवसाय धारकांनी आपल्या प्रतिष्ठान ची नावे मराठीत लिहिण्याकरिता पातुर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली आहे 25 नोव्हेंबर ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तारीख असून प्रशासनाने व्यवसाय धारकांना सूचना पत्रक देणे गरजेचे आहे परंतु या विषयावर कुठल्याच प्रकारे हालचाल नसल्याचे दिसून येत आहे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करावे अन्यथा मनसे खळ खट्याळ टाईप आंदोलन करेल असा इशारा पातुर तालुका मनसे अध्यक्ष डॉ प्रशांत लोथे यांच्या मार्गदर्शनामध्ये पातुर शहराध्यक्ष विलास धोंगडे राहुल भगत, किरण राउत, आकाश वानखडे,छोटू चापाईतकर, कैलास ठक, शेख इम्रान यांनी पातुर तहसीलदार रवींद्र काळे यांना निवेदन दिले या वर प्रशासन काय कारवाई करणार या कडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लक्ष वेधले आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा