काका पुतण्यांनी केली महिलेची हत्या!
अकोला: अकोट फाईल पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या साधना चौकात महिलेची हत्या करण्यात आली असून महिलेचे नाव रुझीना शेख अफसर कुरेशी महिलेचे सासर भुसावळ येथे असल्यामुळे ती महिला भुसावळ येथे राहत असलेल्या विवाहितेची हत्या अकोला येथे झाल्याची घटना समोर आली आहे. सदर महिलेला तीन वर्षाची मुलगी दीड वर्षाचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे .सदर महिलेची हत्या करुन आत्महत्येचा
बनाव केल्याचे समोर आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांनी रुझीनाची हत्या झाल्याचे स्पष्ट केलेमृतक महिलेचा काका मुश्ताक आणि मृतक महिलेचा भाऊ यांनी कट रचुन तिची हत्या केली आणि आत्महत्या दाखविण्याच्या प्रयत्नात ते होते. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.या प्रकरणात पोलिस तपासानंतर नेमके काय प्रकरण झाले याची माहिती समोर येईल.पुढील तपास अकोट फाईल पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू व त्यांची टीम करीत आहे.