शहरातून निघाली ‘वॉक फॉर संविधान’ रॅली!
संविधान प्रचारक लोकचळवळ व इंडियन स्पीकर्स फोरमचा सहभाग
– शहरात संविधान गौरव दिनाचा उत्साह
– महापुरुषांच्या पुतळ्याला ठिकठिकाणी अभिवादन
अकोला – (ता.२६) : संविधान दिनानिमित्त संविधान प्रचारक लोकचळवळ व इंडियन स्पीकर्स फोरमच्या वतीने रविवारी (ता.२६) शहरातून ‘वॉक फॉर संविधान’, रॅली काढण्यात आली. संपुर्ण रस्त्याने संविधान, राष्ट्रीय एकता आणि भारत मातेच्या जयघोष करीत हातामध्ये संविधान आणि तिरंगा घेऊन संविधान दिन साजरा करण्यात आला.
श्री. शिवाजी महाविद्यालय, अकोला येथे डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधान रॅलीला सुरूवात करण्यात आली होती. भाऊसाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करत असताना प्राचार्य. डॉ. अंबादास कुलट, ॲड. गजानन पुंडकर, विजय ठोकळ उपस्थीत होते. त्यांनतर सविधान रॅलीला सुरुवात झाली. रेल्वेस्थानक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर गांधी जवाहर बाग येथे महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू, ब्रिजलाल बियाणी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. पुढे अशोक वाटिका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समीक्षाराजे खुमकर, राधा, मेघा पाचपोर, गौरी सरोदे, विजय कौसल, अक्षय राऊत, चंद्रकांत झटाले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी एकमेकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रभात फेरीला यशस्वी करण्यासाठी विकास जाधव, आकाश पवार, अक्षय राऊत, हरिओम राखोंडे, अमोल भटकर, रोहित जगताप, राधा, गौरी सरोदे, अंबिका मोरे, गौरव डोंगरे, पवन मंगळे यांनी मेहनत घेतली.
————————————-
२६/११ च्या हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली
२६/११ च्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली यावेळी अर्पण करण्यात आली. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. आकाश पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर्वांचे आभार मानले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
————————————-
आजही संविधान विशिष्ट जाती धर्माचं आहे असा जनलोकांमध्ये भ्रम आहे. तो दूर करण्यासाठी वर्षभर शाळा, महाविद्यालय आणि वेगवेगळ्या संस्था तसेच गावोगावी जाऊन संविधान जनजागृतीचे कार्य करण्याचा संकल्प संविधान दिनी आम्ही केला आहे.
– अक्षय राऊत, अकोला
————————————-
संविधान दिन हा मानव मुक्तीचा आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणारा दिवस आहे. आपण हा दिवस सर्वांनी मिळून उत्सव म्हणुन साजरा केला पाहिजे. तसेच आज संविधान घेऊन चालत असताना ऊर्जा मिळाली.
– आकाश पवार, अकोला