संविधान दिनानिमित्त अकोला महानगरपालिकेत अधिकाऱ्यांची उपस्थिती नगण्य!
अकोला महापालिका दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला यासंविधान दिन हा मानव मुक्तीचा आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणारा दिवस आहे. आपण हा दिवस सर्वांनी मिळून उत्सव म्हणुन साजरा केला पाहिजे. तसेच आज संविधान घेऊन चालत असताना सविधान दिना निमित्ताने मात्र अकोला महानगरपालिकेतील जबाबदार अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्या होत्या. पण वरील छायाचित्र बघता उपस्थिती या कार्यक्रमास अधिकाऱ्यांची संख्या नगण्य होती तसेच वर्षभरात शासनाच्या जीआर प्रमाणे अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. पण उपस्थिती मात्र किरकोळ लोकांचीच असते. यावरून हे जबाबदार अधिकारी आपले कर्तव्य कार्यक्रमास गैरहजर राहून किती चांगल्या प्रकारे बजावतात हे निदर्शनास येते. तसे पाहता वर्ग एक वर्ग दोन व वर्ग तिन यासारखे सर्व कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थिती राहायला हवे होते. मात्र तसे दिसून आले नाही. वरून अकोला मनपा काटेकोर नियमाप्रमाणे चालवत असल्याचे इतर वेळी लोकांना मात्र किती चांगले काम करतो भासवतात यावरून यांच्या कर्तव्यात कसूर किती आणि कर्तव्य बजाण्यास तत्पर किती ही तफावत का आहे. असे सामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे.