जवाहर नगर येथील जॉईन कॅफे व दब्लॅक कॅफे वर पोलिसांची रेट!
अकोला विधान पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या जवाहन नगर भागातील जॉईन कॅफे,व दब्लॅक कॅफे यांचेवर दि.२४.११.२०२३ रोजी दुपारी ०३.३० वा रेड केली असता रेड करून कॅफेमध्ये व कॅफे समोर असभ्य वर्तन करणारे मुला, मुलीवर तसेच कॅफे मालक यांचेवर बि.पी. अॅक्ट नुसार प्रतीबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. आता सदरचे कॅफे बंद आहेत. तसेच अकोला महानगर पालीका यांचे कडे सदर कॅफेच्या परवाना रद्द करण्याबाबत पत्रव्यवहार करण्ययात आला. सदरची कार्यवाही ही . पोलीस अधीक्षक संदीप घुगे , अप्पर पोलीस अधीक्षक डोंगरे . उपविभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग दुधगावकर यांचे मार्गदर्शनात दामीनी पथक इंचार्ज पो.नी.देवकर व सिव्हील लाईनचे पोलीस निरीक्षक.शिरस्कार कर्मचारी ए.एस.आय. मनोज घोडे यांनी केली आहे.