खाजगी बस मधील ८० लाख रुपयांची बॅग लंपास!
अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
पातुर – स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकोला ते वाशिम मार्गावर पातुर नजीक एका धाब्यावर खाजगी बस थांबली होती,त्यास दरम्यान बस मधील ८० लाख रुपयांची बॅग अज्ञात आरोपीने लंपास करून पोंबारा केल्याची घटना रविवारी २६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली, सदर घटनेची फिर्याद दिली वरुन पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला,
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला ते वाशिम मार्गावर पातुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ढाब्यावर खाजगी लक्झरी बस दिनांक २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास थांबली होती, सदर बस मधील प्रवासी आंगडीया कंपनीतील राजु प्रज्यापती हे बस थांबली असता आपल्या कडील रोख रक्कम ८० लाख रुपयांची बॅग व महत्वाची स्वतःचे दस्तऐवज व स्वतः कडील ०६ हजार रुपये असा एकूण ८० लाख ०६ हजार रुपये रोख रक्कमेची बँग बस मधेच ठेवून बस मधुन खाली ढाब्यावर उतरले, लघु शंका करून,व काही साहित्य खरेदी करून परत बस मधील आपल्या सिटवर बसण्यासाठी आले असता, त्यांना तेथे आपली बॅग रोख रक्कम ८० लाख रुपयांची बॅग दिसली नाही,ती कुणीतरी लंपास केली अशी फिर्याद राजु प्रज्यापती यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली, वरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा अधिक तपास केला असता सुगावा लागला नाही, दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून, ठाणेदार किशोर शेळके यांनी सदर घटनेची दखल घेऊन तपास सुरू केला आहे, पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत,
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा