कुवरदेव लोकनियुक्त सरपंच सह सहकार्याचा राष्ट्रवादी कॉग्रेस मधे जाहिर प्रवेश
जळगाव जामोद तालुक्यात काही दिवसां आधी झालेल्या कुवरदेव ग्रामपंचायत निवडनुकी मधे जनतेतुन निवडून आलेले लोकनियुक्त जुमानसिंह मुजलदा यांचा त्यांच्या सहकार्यासह दिनांक 23/11/2023 रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते, जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांच्या हस्ते जाहिर पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. सरपंच यांच्यासह राजू भुवानसिंग मुजलदा, भारत भावसिंग चव्हाण, कालु बामन्या, दिलीप मुजलदा, अर्जुन भुरा डूडवा गोमाल यांचा पक्ष प्रवेश पार पडला. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी आदिवासी, गोरगरीब जनतेसाठी केलेले काम तथा सुख दुःखात धावुन जानारे नेते प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याच्या भावना सरपंच मुजलदा यांनी व्यक्त केल्या. सदर प्रवेशावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अधि. मोहसीन खान, जिल्हा सरचिटनीस संजय ढगे, शहराध्यक्ष ईरफान खान, संजय देशमुख, फिरोजभाई ऑटोवाले,सिद्धार्थ हेलोड़े, संतोष वेरुळकार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.