मनोज जरांगे पाटील यांचा विदर्भ दौरा सोमवारी खामगावात जाहीर सभा
खामगाव – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे ४ डिसेंबर २३ रोजी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजता जळगाव खा. जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे जाहीर सभा होणार असून त्यानंतर विदर्भातील मलकापूर येथे दुपारी १ वाजता जाहीर सभा होणार आहे. तर खामगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प. मैदान येथे दुपारी ४ वाजता जाहीर सभा होणार आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील शेगाव येथे श्रींच्या दर्शनासांठी जाणार असून तेथे मुक्काम करणार आहेत.
शहरातील सभेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सकल मराठा समाज बांधवांची नियोजनं बैठक २५ नोव्हेंबर रोजी हॉटेल तुळजाई येथे पार पडली. सभेच्या यशस्वीतेसाठी सकल मराठा समाज बांधवांकडून जय्यत तयारी केली जात आहे. सभेला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे, तसेच खामगाव येथील सभेच्या अनुषंगाने अधिक माहितीसाठी समाज बांधवांनी मो. ९८२२७०९२९८ यावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.