दहा वर्षाआधी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी दिंडीचं आयोजन केलं होतं. त्यावेळेस त्यांनी सोयाबीनला 6 हजार भाव द्या अशी मागणी केली होती. आज कापसाला 14 हजार भाव दिला पाहिजे आणि सोयाबीनला 8 हजार भाव दिला पाहिजे अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीस यांना केलीय.
जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचं काम राज्य शासन करत आहे, असा घणाघात अनिल देशमुखांनी केलाय. अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलन दरम्यान अमानुष लाठीचार्ज करण्यात आला होता. असा अमानुष लाठी हल्ला गृहामंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस अधीक्षक करू शकत नाही. असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय.
महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, सध्या अतिवृष्टीचा मोठा प्रश्न राज्यात आहे. अशावेळेस मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी तेलंगणात जात आहेत, याची तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे. अशी टीका अनिल देशमुखांनी केली. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, बेरोजगारीकडे, महागाईकडे लक्ष द्यावं, अशी विनंतीही अनिल देशमुखांनी केली.
लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजित दादांना साईडलाईन करतायेत, हे सर्वांना माहीत आहे. पण ते आता पासूनच अजित दादांना का साईडलाईन करतायेत, याचा पेच आम्हालाही पडलाय
मी त्यावेळी समझोता केला असता तर माझ्यावर जेल जायची पाळी आली नसती. मी सुद्धा सरकारमध्ये सामील झालो असतो. मंत्री झालो असतो. असा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केलाय. आमचे सहकारी गेले हे प्रेमापोटी नाही गेले. ज्या प्रमाणे अनिल देशमुखांना त्रास झाला तसा आपल्याला होऊ नये म्हणून आमचे जुने नेते तिकडे गेले. असा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केलाय. जाईल मध्ये कसा त्रास होतो, ते माझ्याकडून एकूणच तिकडे गेले. अशी मिश्किल टीकाही अनिल देशमुखांनी केलीय.