अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या संभाजी ब्रिगेडची मागणी

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या संभाजी ब्रिगेडची मागणी

अकोला. दिनांक 26 पासून अकोला जिल्ह्यासह राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी दोन्ही पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात पावसाने दीड महिन्याचा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन हे अतिशय कमी प्रमाणात पिकले व याचा परिणाम तूर कपाशी मका इत्यादी पिकावर झाला पाऊस नसल्यामुळे शेतात मोठमोठ्या भेगा पडल्या व कपाशीचे पीक सुद्धा सुकले त्याचप्रमाणे तुरीला पाहिजे तसे फुले लागले नाहीत.
परं खरिपाचा हंगाम गेल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी मोठ्या प्रमाणात केली होती आणि आपली शेती पूर्णपणे तयार करून हरभरा पिकाची पेरणी जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात झाली हरभरा पेरणीनंतर आठवड्याभरातच या अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आणि पावसाबरोबरच धुके सुद्धा मोठ्या प्रमाणात आल्याने काही हरभरे हे उगवल्यानंतर धुक्यामुळे जळून नष्ट झाले तर काही हरभरे अति पावसामुळे जमिनीतच कुजले.
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून या अतिवृष्टीच्या पावसाचा सरकारने सर्वे करून तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड अकोला जिल्ह्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देतेवेळी महानगर अध्यक्ष योगेश ढोरे, प्रभारी जिल्हाध्यक्ष गणेश अंदुले,जिल्हा उपाध्यक्ष शैलेश तायडे, अकोला ता अध्यक्ष भूषण तायडे, जिल्हा संघटक कुशल जैन,महानगर उपाध्यक्ष पंकज बजोड, जिल्हा मार्गदर्शक देवानंद साबळे, जिल्हा कार्यध्यक्ष, नमन आंबेकर,गणेश खोटरे, मंगेश माकोडे,संदीप उपरवट,परीक्षित ढोरे महागाव, अशोक फकीरा चव्हाण [राजनखेड ] अमोल ढोरे महागाव ग्रा.सदस्य, स्वप्निल धांडे, आनंद भगत,यांच्यासह अनेक शेतकरी व पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news