सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर 5 जानेवारीला झळकणार!
अकोला – अनंत युगाच्या स्त्री जन्मातील अंधाराला प्रकाशमय करणारी क्रांतीज्योत’; सावित्रीमाईचा लूक रिलीज ‘सत्यशोधक’ चित्रपटा मध्ये राजश्री देशपांडे साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमिका आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देत, समाजाचा रोष पत्करून फक्त महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सहाय ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमरी जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर या चित्रपटातील सावित्रीमाईच्या भूमिकेतील राजश्री देशपांडे यांचे पोस्टर म्हणजेच फर्स्ट लूक प्रकाशित करण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हे पोस्टर प्रकाशित करण्यात आले.या समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत निलेश जळमकर लिखित- दिग्दर्शित, संकल्पना राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर हर्षो तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत.
शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकार्र.आहेत. निर्मिती मध्ये निखिल रघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जाने., २०२४ रोजी प्रदर्शित होईल.