खाजगी बस मधील ८० लाख रुपयांची बॅग लंपास, प्रकरणी एकास अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
घटनेतील 79 लाखांचा ऐवज हस्तगत
पातुर – स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकोला ते वाशिम मार्गावर पातुर नजीक एका ढाब्यावर ब्यावर खाजगी बस थांबली होती,त्यास दरम्यान बस मधील ८० लाख रुपयांची बॅग अज्ञात आरोपीने लंपास करून पोंबारा केल्याची घटना रविवारी २६ नोव्हेंबर रोजी घडली होती, घटनेची फिर्याद वरुन पातुर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता,
अखेर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व पातुर पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीतील एकास मुद्दे माल रोख रक्कम सह ताब्यात घेऊन सदर घटनेतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
अकोला ते वाशिम मार्गावर पातुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ढाब्यावर खाजगी लक्झरी बस दिनांक २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास थांबली होती, सदर बस मधील प्रवासी आंगडीया कंपनीतील राजु प्रज्यापती हे बस थांबली असता आपल्या कडील रोख रक्कम ८० लाख रुपयांची बॅग व महत्वाची स्वतःचे दस्तऐवज व स्वतः कडील ०६ हजार रुपये असा एकूण ८० लाख ०६ हजार रुपये रोख रक्कमेची बँग बस मधेच ठेवून बस मधुन खाली ढाब्यावर उतरले, लघु शंका करून,व काही साहित्य खरेदी करून परत बस मधील आपल्या सिटवर बसण्यासाठी आले असता, त्यांना तेथे रोख रक्कम ८० लाख रुपयांची बॅग दिसली नाही,ती कुणीतरी लंपास केली अशी फिर्याद राजु प्रज्यापती यांनी पातुर पोलिसात दिली होती, दरम्यान ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा अधिक तपास केला असता सुगावा लागला नव्हता.
अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक शंकरराव शेळके, पातुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके,यांनी एक पथक नेमून सदर घटनेचे धागेदोरे तपासणी करून तांत्रिकदृष्ट्या तपासणी करत सदर आरोपी हा आंतरराज्यीय टोळीतील असावा असा संशय आला, त्या दृष्टीने अत्यंत शिताफीने आरोपी निष्पन्न करून एक पथक आरोपी शोध कामी मध्यप्रदेशातील ग्राम रेखा तालुका मनवार जिल्हा धार येथील आरोपी विनोद चव्हाण वय १९ राहणार लुन्हेरा बु तालुका मनवार यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी अंती सदर घटनेतील गुन्हाची कबुली दिली,तर त्यांच्या राहत्या घरातून रोख रक्कम ७९ लाख ( ऐकोण अंशी लाखांचा ऐवज हस्तगत केला, दरम्यान त्याचा दुसरा साथीदार पोलिसाचा संशय आल्याने पसार झाला,ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक शंकरराव शेळके साहेब यांनी यशस्वी कामगिरी करत आंतरराज्यीय टोळीतील एकाच्या मुसक्या आवळल्या,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकरराव शेळके, सहायक पोलिस निरीक्षक कैलास भगत, गोपाल जाधव, गणेश पांडे, राजपाल सिंग ठाकुर, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद,विशाल मोरे,एजाज अहमद,वसिमोदीन शेख, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, स्वप्निल चौधरी , राहुल गायकवाड, अन्सार शेख, मोहम्मद आमीर, लिलाधर खंडारे,खुशाल नेमाडे, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, प्रशांत कमलाकर, अनिल राठोड आदी स्थानिक गुन्हे शाखा व पातुर पोलिसांनी यशस्वी कामगिरी केली,
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा