पातूर बाळापूर रोड वरील जीवघेणे खड्डे बुजवीण्या करिता वंचित स्टाईल आंदोलन..
विविध ठिकाणी हार घालून श्रद्धांजली…
पातूर : आज दि : 03/12/2023 रोजी वंचित बहुजन आघाडी पातूर शहर यांच्या वतीने बाळापूर रोड वरील जीवघेणे पडलेले खड्डे त्याकरिता जाहीर निषेध म्हणून हार टाकून श्रद्धांजली चा कार्यक्रम करण्यात आला. प्रशासनाला ही बाब लक्षात येण्याकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले.बाळापूर नाका समोरील खड्डे, रेणुका माता टेकडी समोरील पडलेले मोठे जीवघेणे,धोकादायक व दयनीय खड्डे वंचित बहुजन आघाडी पातूर शहर यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी अध्यक्ष मो.जैद मो.सईद , महसचिव भिमराव पोहरे, उपाध्यक्ष शिवलाल पुरुषोत्तम, सह संघटक सतिश सुरवाडे, उपाध्यक्ष विजय हिरळकार, सचिव इमरान ठेकेदार, उपाध्यक्ष संदीप गवई, सचिव सुरज धाडसे,सैयद जावेद, उपाध्यक्ष हबीब पेंटर, वंचित बहुजन आघाडी प्रसिद्धी प्रमुख अविनाश पोहरे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा