सावित्रीबाई फुले विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन
तब्बल 62 प्रतिकृतीसह विद्यार्थ्यांचा सहभाग
प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड.
पातूर : 51 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे अनुषंगाने आयोजित शालेय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पातुर येथे दिनांक एक व दोन डिसेंबर रोजी करण्यात आले होते.
सदर विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्राथमिक गट 6 ते 8 व माध्यमिक गट 9 ते 10 च्या विद्यार्थ्यांनी 62 प्रतिकृतीसह सहभाग नोंदवला होता.
दिनांक 1 डिसेंबरला विद्यालयाच्या विज्ञान कक्षांमध्ये सदर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन संस्था अध्यक्षा सपनाताई म्हैसणे यांच्या हस्ते करण्यात आले तर तर प्रमुख पाहुणे म्हणून भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.गोविंद भालेराव प्राध्यापक नवले, प्राध्यापक प्रदीप शिरसागर मुख्याध्यापक सचिन ढोणे प्राचार्य जयद्रथ कंकाळ यांच्या उपस्थिती लाभली होती.
सदर विज्ञान प्रदर्शनी चा विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा होता त्याला अनुसरून सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन आरोग्य,विज्ञान, शेती/कृषी,दळणवळण आणि वाहतूक व संगणकीय विचार या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रतिकृतीचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतीचे मूल्यांकन डॉ. प्रा. गोविंद भालेराव,प्राध्यापक नवले,प्राध्यापक प्रदीप क्षीरसागर यांनी करून प्राथमिक गटातून इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी कु. साऊ सचिन ढोणे व दक्ष बंडू उगले यांना प्रथम क्रमांक दिला तर माध्यमिक गटातून यश देविदास इंगळे याने प्रथम क्रमांक मिळवला त्यामुळे त्यांची निवड तालुकास्तरावर करण्यात आली या प्रदर्शनी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या व सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक दिनेश करोडदे,श्रीकृष्ण शेगोकार, उद्धव काळपांडे,देविदास राठोड सह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा