उद्या रोजी चरणगाव येथे होणा-या जरांगे पाटील यांच्या सभेला पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन ची टीम देणार निर्गुणा नदीपात्रातील पुलावर सेवा आणी सुरक्षा व्यवस्था
पातूर तालुक्यातील चरणगाव येथे जरांगे पाटील यांच्या सभेला येणा-या मराठा बांधवांच्या सेवेसाठी उद्या 5 डिसेंबरला सकाळी 8 वाजता पासुन चरणगाव येथील निर्गुणा नदीपात्रातील पुलावर पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध बचाव पथकाची रेस्क्यु टीम आणी सर्च & रेस्क्यु रुग्णवाहिका,मेडीसीन ऑक्सिजन सेटप, प्रथमोपचार CPR,EMS, सुविधांसह तसेच चरणगाव कडुन नदीवरील अरुंद पुलावरुन सभास्थळी व पार्किंग स्थळी जातांना कुठला अपघात होऊ नये करीता इनर्फरमेशन देण्यासाठी साऊंडसह आमची टीम सेवा आणी सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी सज्ज राहणार आहे_
उद्या अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे मराठा आरक्षण संदर्भात होणा-या जरांगे पाटील यांच्या सभेला जिल्ह्यासह ईतरही जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव हजेरी लावणार आहेत याकरीता चरणगाव येथील निर्गुणा नदीपात्रातील पुलावरुन सभास्थळी व पार्किंग स्थळी जातांना कुठला अपघात होऊ नये याची दक्षता लक्षात घेऊन अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार सर आणी अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर यांच्या आदेशाने पातुर तहसीलदार रवी काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला चे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांच्या नेतृत्वात सेवा सुरक्षा देण्यासाठी रेस्क्यु टीम सज्ज राहणार आहे. अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा